मुंबई (प्रतिनिधी ) : कोरोना महामारी आणि स्टेशन परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या व्यक्तींचे फोटो काढणारे क्लीनअप मार्शल मुंबईतून हद्दपार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या टोळींकडून मोठ्याप्रमाणात वसूली होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संतापलेल्या नागरिकांनी यांना जाबदेखील विचारले असल्याचे अनेक प्रकार मुंबईत घडले होते त्यामुळे कंटाळलेल्या पालिका प्रशासनाने यांना कायमचे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
आता क्लीन अप मार्शलच्या ऐवजी पाच हजार स्वच्छता दुतांची नियुक्ती केली जाणार असून स्वच्छता दूत दंडात्मक कारवाई करणार नसून फक्त जनजागृती करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये कोविड वॉरियर्सना पालिकेचे स्वच्छतादूत म्हणून सामावून घेण्यात येणार आहे.