Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून ठाणेकरांना लाखोचा चूना

अनेक श्रीमंत गुजराती समाजाच्या व्यापाऱ्यांना लुटले

ठाणे (प्रतिनिधी ) : रोजच्या जीवनापासून कंटाळला आला असेल तर एक नवीन अनुभव आम्ही तुम्हाला देऊ असे तुम्हाला कोणी सांगत असेल तर सावधान कारण असाच प्रकार ठाण्यातील काही नागरिकांसोबत घडला आहे. फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून नवीन मुलींसोबत बोलण्यासाठी ठाण्यातील घोड़बंदर भागातील महिलांनी लाखोचा चुना लावला असल्याची घटना उघडकीस आली आहे.पहिले संबधित मूली पुरुषांशी मैत्री करतात आणि त्यानंतर व्हाट्सअप चॅट व्हायरल करण्याची भीती दाखवत ब्लेकमेल करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आपल्या कुटुंबाला हे प्रकार कळू नये म्हणून अनेक नागरिकांनी या महिलांना लाखो रूपये दिले असल्याची धक्कादायक माहिती यावेळी कळाली आहे.

इंटरनेट आणि प्रसारमाध्यमांचे वाढते जाळे नागरिकांचे काम जलद गतीने होत आहे यामध्ये दुमत नाही मात्र दुसरीकडे याच इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांना चुना लावण्यात येत असल्याचे प्रकार ठाण्यात उघडकीस आले आहे. एका प्रसिद्ध गुजराती वृत्तपत्रात फ्रेंडशिप म्हणून कॉलम येतो आणि त्याठिकाणी नागरिकांना नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येते. त्यानंतर त्यांना संबधित महिलांचे मोबाईल नंबर देण्यात येतात. संबधित मुलींचे किंवा महिलांचे मोबाईल नंबर मिळाल्यानंतर विविध विषयांवर चर्चा होते आणि त्यानंतर संबधित महिलांकडून पुरुषांना त्यांच्यात विविध विषयांवर व्हाट्सअपवर झालेली चर्चा व्हायरल करण्याची भीती दाखविण्यात येते, ठाण्यातील घोड़बंदर भागातील अनेक श्रीमंत गुजराती समाजातील व्यवसायिक या घोटाळ्यात फसले असल्याचे कळाले आहे. बदनामीच्या भीतीने गुजराती समाजातील  अनेक व्यवसायिक व्यक्तींने संबधित महिलांना लाखो रूपये दिले असल्याचे यावेळी कळाले आहे.

Related posts

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे अपघातात निधन; तिघे किरकोळ जखमी

dhakkadayak

टीईटीच्या परीक्षेत मुंबई विभागाचा निकाल केवळ १ टक्के

dhakkadayak

ठाण्यात धक्कादायक प्रकार रिक्षाचालकाने केला बावीस वर्षीय मुलीचा विनयभंग

dhakkadayak

Leave a Comment