भूमाफिया, हॉटेल मालक, बंगले मालकांवर अधिकाऱ्यांचा हात ?
ठाणे (प्रतिनिधी ) : ठाणे शहराला ऑक्सीजन पुरविनाऱ्या येऊर जंगलात भूमाफियाच्या मदतीने अनधिकृतपणे हॉटेल आणि बंगल्याच्या वाढत्या संख्येमुळे येऊर जंगलातील पक्षी आणि प्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. येऊरमध्ये वाढत्या अतिक्रमणाला थांबविले नाही तर येऊरमधील प्राणी – पक्षी गायब होणार असल्याची भीती वन हक्क समितीने व्यक्त केले आहे. अनेक वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला आहे. मात्र अधिकारी दाखविण्यासाठी तुरळक कारवाई करुन हात झटकतात.