Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

पहिले कोरोना तर आता संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांच्या गैरहजरीमुळे शुकशुकाट
बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
मुंबई (प्रतिनिधी ) :  राज्यात कोरोना महामारीचा सर्वात जास्त फ़टका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. या परिस्थितीमधून शाळा बाहेर येत असतांना राज्य सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेल्यामुळे राज्यभरातील शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या संपात राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले असल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा ओस पडल्या आहेत. काही शाळांना तर सुट्टी जाहीर करावी लागण्याची परिस्थिती राज्यभरात निर्माण झाली आहे.
       बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत त्याचप्रमाणे बारावीच्या पेपर तपासणीचे काम सुरु आहेत असे असतांना कनिष्ट महाविद्यलयीन शिक्षक या संपात सहभागी झाल्यामुळे बारावीचे निकाल उशीराने लागणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे राज्यभरात चित्र आहे.
    जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे शाळांना कुलूप लवण्याची वेळ आली आहे. शिक्षक संपावर गेल्याने बारामती तालुक्यातील 278 शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 735 माध्यमिक शाळा संपामुळे बंद आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या 3569 शाळा सध्या बंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1386 शाळा असून त्यात 3466 शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत. सिंधुदुर्गात 3243 शिक्षक संपात सहभागी असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 1307 शाळा बंद आहेत.

Related posts

कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ

dhakkadayak

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना अभिवादन

dhakkadayak

तुमचा दिवाळी फराळ सुरक्षित आहे का ? धक्कादायक बातमी

dhakkadayak

Leave a Comment