धक्कादायक न्यूजच्यावतीने नशामुक्त तरुण मोहीम सुरू
ठाणे (प्रतिनिधी ) : तरुण आणि लहान मुले आपल्या देशाचे भविष्य आहे. हेच युवा वर्ग आपल्या देशाची विविध जबाबदारी घेतील असा विश्वास आहे मात्र राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विकणारी टोळी मोठ्याप्रमाणात सक्रिय झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील लुईसवाडी, हाजुरी आणि जवळील परिसरातील तरुण हे विविध नशेच्या आहारी गेले असून त्यांचे भविष्य अंधारात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे हाजुरी आणि ठाण्यातील इतर भाग नशामुक्त किंवा ड्रग्स मुक्त करण्याची मोहीम धक्कादायक न्यूजकडून सुरू करण्यात आली आहे. जोपर्यंत ठाण्यातील ड्रग्स विकणारी शेवटची टोळी जेरबंद होत नाही तोपर्यंत विविध खुलासे आणि भांडाफोड आमच्या धक्कादायक न्यूजच्या टीम कडून करण्यात येणार आहे. ही नशामुक्तीची मोहीम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातून सुरू करण्यात येत आहे.हाजुरी आणि जवळील परिसरातील मुलांकडे अंमली पदार्थ कुठून येते, कोणता ड्रग्स पेडलर्स आहे ते कोणकोण यात सहभागी आहे याची चौकशी करण्याची मागणी आम्ही यावेळी करत आहोत