Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

आरटीई प्रवेश रखडणार ; खासगी शाळांकडून दादागिरी सुरु

मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागावरील आरटीई प्रवेश सुरु आहे मात्र खासगी शाळांनी आडमुठी भूमिका घेत विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेश न देण्याचा इशारा दिला आहे. सरकारने खासगी शाळांची थकित शुल्क प्रतिपूर्ति लवकर दिली नाही तर आरटीईचे प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे धमकी दिली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात आले नाही तर आरटीई प्रवेश अडचणीत येणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे. Rte admission 2023

            समाजातील आर्थिक दुर्बल घटकतील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेत मोफत शिक्षण मिळावे म्हणून २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार या जागांवर प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या विद्यार्थ्यांचा खर्च केंद्र सरकारकडून देण्यात येते मात्र गेल्या वर्षभरापासून खासगी शाळांचे जवळपास १ हजार कोटी शुल्कप्रतिपूर्ती केंद्र सरकारने दिली नसल्यामुळे शाळांनी यंदा आडमुठी भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)ने संघटनेच्या कार्यकारिणीची तातडीची एक बैठक २६ मार्च रोजी ठाण्यात आर.पी. मंगला हायस्कूल येथे बोलावली आहे. या बैठकीत आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचा परतावा आणि त्यावर संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी दिली.

Related posts

मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल !: एच. के. पाटील.

dhakkadayak

वरळी येथे समुद्रात ५ मुले बुडाली ; दोन मुलांचा मृत्यू

dhakkadayak

पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण वाढले

dhakkadayak

Leave a Comment