नवी दिल्ली : विविध पक्षांचे ७२ राज्यसभा खासदार आज निवृत्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना निरोप देताना भावुक उद्गार काढले आहेत. ‘या खासदारांच्या निवृत्तीने आम्हाला अनुभवी साथीदारांची कमतरता जाणवेल. काही वेळा शैक्षणिक ज्ञानापेक्षा अनुभवामध्ये जास्त शक्ती असते. खरंतर हा निरोप देण्याचा समारंभ आहे, मात्र आमची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा खासदार म्हणून या सभागृहात परत यावं,’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. (Narendra Modi In Rajya Sabha)
‘आपण बराच काळ या संसदेत घालवला आहे. या सदनाला आपण जेवढं योगदान दिलं आहे, त्यापेक्षा जास्त योगदान या सदनाने आपल्या आयुष्यात योगदान दिलं आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून मिळालेला अनुभव आपण देशाच्या प्रगतीसाठी वापरला पाहिजे,’ असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी निवृत्त होत असलेल्या खासदारांना केलं आहे.
राज्यसभेच्या १३ जागांसाठी मतदानएकीकडे राज्यसभेतील ७२ खासदार निवृत्त होत असताना दुसरीकडे राज्यसभेच्या १३ जागांसाठी आज मतदानही होत आहे. पंजाब, केरळ, आसाम, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा या सहा राज्यातील १३ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या २४५ जागांपैकी सध्या ९७ जागांवर भाजपचं वर्चस्व असून ही संख्या वाढवण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून प्रयत्न केले जात आहेत, तर विरोधी पक्षांनीही भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखली आहे.
महत्तवाचा लेखउद्या पटोलेंच्या घरी धाड टाकली तरी…; संजय राऊतांचा विरोधकांना खोचक टोला