Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Breaking Newsअंतरराष्ट्रीयभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणव्यवसायव्हिडिओसामाजिक

‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन

कीव्ह, युक्रेन :रशिया आणि युक्रेन युद्धाला आता महिना उलटून गेलाय. या दरम्यान दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र या चर्चांतून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हल्ले अद्यापही सुरूच आहेत. तर ‘आम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही’ असं म्हणत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपला विश्वास उडाल्याचं सांगितलंय. याच दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थता करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय. भारत – युक्रेन संबंधांविषयी

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ‘एनडीटीव्ही’शी संवाद साधताना मोदींना मध्यस्थतेसाठी आवाहन केलंय. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारत समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे खरं आहे (भारतानं संयुक्त राष्ट्रात मतदानापासून लांब राहण्याची भूमिका घेतली होती) युक्रेन हा नेहमीच भारताच्या अन्नसुरक्षेचा एक हमीदार देश राहिलाय. आम्ही अनेक उत्पादनं पुरवतो. हे परस्पररित्या लाभदायक संबंध आहेत, असं दिमित्रो यांनी भारताशी संबंधांबद्दल म्हटलं. ‘मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’

‘जगात एकच व्यक्ती आहे ज्याला हे युद्ध हवंय आणि ती व्यक्ती म्हणजे व्लादिमीर पुतीन… हे युद्ध थांबवण्यासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर आम्ही त्यांच्याविरोधात का असावं? रशियानं युक्रेनमध्ये रणगाडे आणि लढावू विमानांसहीत प्रवेश करेपर्यंत युक्रेन हे अनेक भारतीयांसाठीही घर राहिलंय. या विद्यार्थ्यांनी परत यावं, अशी आमची इच्छा आहे’

रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन हे निर्णय घेणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे हे युद्ध कसं संपवायचं, याबद्दल मोदींनी त्यांच्याशी थेट बोलणं आवश्यक आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

Vladimir Putin: युक्रेन युद्धात आपल्याच लष्कराकडून पुतीन यांची दिशाभूल, अमेरिकेचा दावालष्करसज्जता घटवण्याच्या घोषणेनंतरही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूचRussia Ukraine War: बचावात्मक पवित्रा सोडून युक्रेन आक्रमक! रशियावर डागलं क्षेपणास्ररशियाच्या भूमिकेवर अविश्वास

युक्रेननं युद्ध थांबवण्यासाठी हरएक पर्याय रशियासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जमिनीवर स्थिती पाहण्याची आवश्यकता आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या चर्चेवरही परिणाम होतोय. कीव्ह आणि चेर्नेगिव्ह शहरातून रशियाच्या घोषणेनंतरही लष्कर माघारी फिरलेलं नाही. काही शहरांतून रशियन लष्कर परत जाताना दिसत असलं तरी त्याचा अर्थ संपूर्ण सेना परत जातेय, असा नाही. त्यामुळे आम्ही रशियन आश्वासनांवर सावध भूमिकेत आहोत, असं म्हणत कुलेबा यांनी रशियाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय.

खोट्या आश्वासनांतून दिशाभूल करून पूर्व भागात हल्ले घडवून आणण्याचा रशियाकडून खेळी खेळली जात असल्याची शक्यताही कुलेबा यांनी व्यक्त केलीय. रशियाचे रचनात्मक शब्द आणि जमिनीवरची स्थिती यात ताळमेळ नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. ‘पाच आठवड्यांपासून मुलांनाही पाहू शकलेलो नाही’युद्ध काही दिवसांत संपुष्टात येईल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. परंतु, ही शक्यता खोटी ठरलीय. युद्ध दुसऱ्या महिन्यातही सुरूच आहे. आम्ही कुणावरही आक्रमण केलेलं नाही. युक्रेनवरच्या हल्ल्यांत शेकडो महिला आणि मुलं ठार झाली आहेत. गेल्या पाच आठवड्यांपासून मीदेखील माझ्या मुलांना पाहू शकलेलो नाही. त्यांच्याशी कधीतरी फोनवर संवाद साधतोय, असा भावूक अनुभवही दिमित्रो कुलेबा यांनी बोलताना व्यक्त केलाय.

युद्ध संपुष्टात यावं हीच आमची इच्छा आहे. आम्हाला कुणाचाही मृत्यू नकोय. युद्धात मारल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करू इच्छितो, असंही त्यांनी म्हटलं.

PM Imran Khan: ‘शेवटच्या चेंडूपर्यंत पंतप्रधान इम्रान खान खेळणार, राजीनामा देणार नाही’

Sheikh Rasheed Ahmad: कसाबचा पत्ता भारताला कसा मिळाला?; पाकच्या गृहमंत्र्याने केला मोठा दावा

महत्तवाचा लेखVladimir Putin: युक्रेन युद्धात आपल्याच लष्कराकडून पुतीन यांची दिशाभूल, अमेरिकेचा दावा

Related posts

जगभरात तब्बल दोन तास WhatsApp बंद

dhakkadayak

३१ मार्चनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

cradmin

Satish Ukey : हायप्रोफाईल वकील ते राजकारणात उठबस, ईडीच्या रडारवर असणारे कोण आहेत सतीश उके?

cradmin

Leave a Comment