मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन सोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अभिनेत्रीने एका व्यावसायिकाविरुद्ध ४.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आज अभिनेत्रीचा जबाब नोंदवला जाईल.
कंपनी उघडण्याच्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूकलेखी तक्रारीत रिमीने म्हटलं की, तिची अंधेरी येथील एका जिममध्ये आरोपी व्यावसायिक जतिन व्यास याच्याशी भेट झाली होती. साधारणपणे तीन वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली होती. महिनाभरातच दोघेही चांगले मित्र झाले. त्याला एलईडी लायटिंग कंपनी उघडायची होती. त्याने रिमीला आपली योजना सांगितली आणि अभिनेत्रीला गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. तसेच नफा मिळाल्यास तो ४० टक्के परतावा देईल असं वचनही दिलं.
रिमीने त्या व्यक्तीच्या कंपनीवर पैसे लावले. दोघांमध्ये परस्पर करारही झाला होता. मात्र, आता तिची फसवणूक झाली असून व्यावसायिकाने पैसे परत केले नसल्याचं रिमीने सांगितलं. यानंतर खार पोलिसांनी जतीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जतिनविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे.
पुण्याच्या रस्त्यावर रात्री १ वाजता अभिनेत्रीला आला असा अनुभव, पोस्ट होतेय व्हायरल
अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलं काम बॉलिवूडमधून ब्रेक घेतलेली रिमी सेन ‘धूम’ सिनेमात अभिषेक बच्चनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर रिमीची ‘धूम २’ मध्येही छोटी भूमिका होती. अभिनेत्रीने विनोदी सिनेमा ‘हंगामा’ मध्ये काम केलं, याशिवाय रिमी अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि सलमान खान यांच्या ‘बागबान’ चित्रपटात दिसली होती. तसंच ‘गोलमाल’ सिनेमात रिमीने आपल्या विनोदाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं.
करिअरमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रिमीने अचानक चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. अशा परिस्थितीत तिने हळूहळू स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले. दरम्यान, रिमी बिग बॉस रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.
महत्तवाचा लेख’भाऊंशिवायच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही,’ मिथिला पालकरच्या आजोबांचं निधन