Satish Ukey | पहाटे पाच वाजता ईडीने नागपूर येथील सतीश उके यांच्या घरी छापा टाकला. पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते.
Satish Ukey: तब्बल पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते.हायलाइट्स:सतीश उके यांची काँग्रेसशी असणारी जवळीक सर्वश्रूत आहेसतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहेनागपूर: नागपूरातील प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच ईडीने सतीश उके (Satish Ukey) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने ट्विट करून या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये पटोले यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारच्या राष्ट्रद्रोही आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून बंद केला जाईल, असा संदेश दिला जात आहे. मात्र, आम्ही देशाला वाचवण्यासाठी लढत राहू, असे नाना पटोले यांनी सांगितले. (ED action against lawyer Satish Ukey)
Satish Ukey:’त्या’ लॅपटॉपमध्ये लोया केस,फडणवीसांविषयी महत्त्वाची माहिती, उकेंच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोपसतीश उके यांची काँग्रेसशी असणारी जवळीक सर्वश्रूत आहे. त्यामुळे आता सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. ईडीने सध्या सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी होऊन त्यांचावर अटकेची कारवाई होणार का, हेदेखील आता पाहावे लागेल.
सतीश उकेंच्या कुटुंबीयांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपतब्बल पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते. यानंतर उके यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केवळ सतीश उके यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक कागदपत्रे आहेत. भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ शकणाऱ्या केसेस बघण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा लॅपटॉप ताब्यात घेतला असावा, असे उके यांच्या कुटुंबीयांनी म्हटले.
महत्तवाचा लेखSatish Ukey : हायप्रोफाईल वकील ते राजकारणात उठबस, ईडीच्या रडारवर असणारे कोण आहेत सतीश उके?
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.या बातम्यांबद्दल अधिक वाचाWeb Title : congress leader nana patole tweet afted ed detaine satish ukey in nagpur maharashtraMarathi News from Maharashtra Times, TIL Network