Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Breaking Newsअंतरराष्ट्रीयभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणव्यवसायव्हिडिओसामाजिक

उद्या पटोलेंच्या घरी धाड टाकली तरी…; संजय राऊतांचा विरोधकांना खोचक टोला

नवी दिल्लीः नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (satish uke) यांना सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीचे पथक सेमिनरी हिल्स येथील कार्यालयात घेऊन गेले असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक टीका केली आहे. उद्या नाना पटोलेंवर धाड टाकली तरी आश्चर्य वाटणार नाही, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

‘ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. ज्यांच्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावरती कारवाई होत नाही आणि जे माहिती देत आहेत. म्हणजे व्हिसल ब्लोअर आहेत. त्यांच्यावरती महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे. खरं म्हणजे हा एक गंमतीचा विषय आहे. आता चितेंचा विषय राहिलेला नाही. चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. तर गंमत करावी आणि गंमत पाहावी असा विषय झालेला आहे. आज मी नागपूरातल्या धाडीविषयी माहिती पाहिली. मला अनेकांनी नागपूरातून फोन केले. अनेक पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आच्छर्य वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ‘आमचे विरोधी पक्षातले नेते सांगतात की ‘कर नाही त्याला डर कशाला’ असं असेल तर मग आम्ही दिलेल्या पुराव्यांवर तुमच्या तपास यंत्रणा कारवाई का करत नाहीत? न्यायाचा तराजू चोरबाजारातला आहे. न्यायाचा तराजू सरळ नाहीये. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पण महाराष्ट्र आणि जिथे भाजपाचा मुख्यमंत्री नाहीत तिथे हा तराजू एका बाजूने झुकलेला आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजक निर्माण करतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर जर कोणी पाळलेल्या गुंडांप्रमाणे करत असेल तर ती संघराज्य व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे,’ अशी टीकाही राऊतांनी केली आहे.

महत्तवाचा लेखमहाविकास आघाडीतच वाद होणार?; यूपीए अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांनी केलं मोठं विधान

Related posts

३१ मार्चनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

cradmin

Satish Ukey : हायप्रोफाईल वकील ते राजकारणात उठबस, ईडीच्या रडारवर असणारे कोण आहेत सतीश उके?

cradmin

Nana Patole: सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेताच नाना पटोलेंचा संताप, ट्विट करत म्हणाले…

cradmin

Leave a Comment