Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Breaking Newsअंतरराष्ट्रीयभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणव्यवसायव्हिडिओसामाजिक

Satish Ukey:’त्या’ लॅपटॉपमध्ये लोया केस,फडणवीसांविषयी महत्त्वाची माहिती, उकेंच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची माहिती होती. त्या आधारे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळेच ईडीकडून सतीश उके यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सतीश उके यांच्या भावाने केला. पहाटे पाच वाजता ईडीने नागपूर येथील सतीश उके यांच्या घरी छापा टाकला. पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते. ईडीचे अधिकारी घरातून बाहेर पडल्यानंतर सतीश उके यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन आमच्या घरी आले. अधिकाऱ्यांनी आम्हा सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले. फक्त मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या खोलीची झडती घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यांना काहीतरी कागदपत्रे हवी होती, असे उके यांच्या कुटुंबीयांनी म्हटले.

सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक केसेस केल्या होत्या. यापैकी एका प्रकरणाचा निकाल तीन ते चार दिवसांत लागणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून आमच्या घराची रेकी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केवळ सतीश उके यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक कागदपत्रे आहेत. भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ शकणाऱ्या केसेस बघण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा लॅपटॉप ताब्यात घेतला असावा. तसेच निमराळे हत्याकांड आणि न्या. लोया मृत्यूप्रकरणाविषयीही लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती होती, असा दावाही सतीश उके यांच्या भावाने केला.

महत्तवाचा लेखनाना पटोलेंचे वकिल सतीश उके ईडीच्या ताब्यात; जमिनीच्या व्यवहारांप्रकरणी कारवाईची शक्यता

Related posts

जिममधल्या मैत्रीने लावला ४.४ कोटींचा चुना, रिमी सेनने पोलिसांत दाखल केली तक्रार

cradmin

पोलिसाची हिम्मत! लग्नाच्या वाढदिवसाला म्हणाला पश्चाताप दिन; सुट्टीचा अर्ज वाचून तुम्हीही हसाल

cradmin

Nana Patole: सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेताच नाना पटोलेंचा संताप, ट्विट करत म्हणाले…

cradmin

Leave a Comment