बीड : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषद वरिष्ठ नेत्यांकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याचे आरोप मुंडे समर्थंकाकडून करण्यात येत त्यामुळे यंदा भगवानगढावर झालेल्या दसरा उत्सवात पंकजा मुंडे यांनी सर्व प्रश्नांची सडेतोडपणे उत्तरे देत आगामी २०२४ च्या निवडणुकीला तयारीला लागा असे स्पष्ट आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आगामी 2024 विधानसभा निवडणुकीची तयारी करू. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कमळाशिवाय दुसरे बटन लावले नाही. मी आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मांडली. पक्ष कोणा एकामुळे मोठा होत नाही. पक्ष हा संघटन कौशल्यामुळे मोठा होत असतो असे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला. मुंडे यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यानंमध्ये एक नवीन उत्साह आला असून भाजपमध्येदेखील याची चर्चा सुरु झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, कर्नाटक येथून अनेक भाविक भगवान भक्ती गडावर दर्शनासाठी आले होते. यावेळी आयोजित मेळाव्यास माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिन पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, राज्यातून आणि राज्यबाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांचे मी स्वागत करते, हा दसरा मेळावा विचार मांडण्यासाठी असतो, मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. चर्चा, अफवा पसरवितात. ही गर्दी ही शक्ती आहे. संघर्ष करा घोषणा बंद करा. पण संघर्ष नाकारू शकत नाही. भगवानबाबांना संघर्ष करावा लागला. गोपिनाथ मुंडे यांना संघर्ष करावा लागला. मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला चुकणार नाही, मी कधी थकणार नाही, मी झुकणार नाही, पक्ष हा संघटन कौशल्यामुळे मोठा होत असतो असे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला.