ठाणे (प्रतिनिधी ) : साथीचे आजार सुरु असून अनेक मुलांना सर्दी – खोकला चे औषध डॉक्टरांकडून देण्यात येतात मात्र जागतिक आरोग्य संघटणेकडून भारतीय बनावटीचे काही कफ सिरप लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे. आरोग्य संघटनेच्या या दाव्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून याधी अनेक अशा औषध संदर्भात माहिती देण्यात आली होती त्यावर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घेत त्यासंदर्भात खुलासा मागविण्यात आले होते त्यामुळे आता WHO कडून करण्यात आलेल्या दव्यानंतर काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Gambia urgently recalls India-made cough syrups blamed for 66 child deaths
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या कफ सिरपवरुन एक महत्त्वाचा अलर्ट ( WHO Alert ) जारी केलाय. भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपवरुन हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गांबिया नावाच्या देशात 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलीय. त्यानंतर पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय. प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.