Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे – ठाकरे गट आमनेसामने

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर हटवून शाखेला लागले टाळे

ठाणे (प्रतिनिधी ) : ठाण्यातील मनोरमानगर येथील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट यांच्या जोरदार संघर्ष झाला असल्याचे प्रकरण ताजे असतांना शुक्रवारी कोपरी येथील कोळीवाड़ा शाखेचा ताबा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार गरमागरमी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन प्रकरण शांत केले, याठिकाणी लावण्यात आलेल्या दसरा मेळावा बैनरवरुन हा सर्व वाद झाला असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.
           दसरा मेळाव्याच्या गरमागरमी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शाखा पातळीवर वाद सुरु झाला आहे. ठाणे पूर्व येथील शाखेला याच वादातून अखेर टाळे लावून दोन्ही गटाच्या नेत्यांना चाव्या सोपविण्यात आल्या.
         शिवसेनेचे दोन्ही गट आता एका एका शाखेसाठी लढताना दिसत आहेत. ठाण्यातील मनोरमानगर येथे झालेल्या वादानंतर आज दोन्ही गट ठाणे पूर्व कोळीवाडा येथील शाखेत आमनेसामने आले. सदर शाखेला तोडण्याची अफवा उद्धव गटातील कार्यकर्त्यांच्या कानावर आल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. सदर शाखेची पुनरबांधणी करावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते तर सदर शाखेची डागडुजी गेल्याच वर्षी झाल्याने त्याची गरज नसल्याचे मत उद्धव गटाने व्यक्त केले. शाखा कोणाचीच खाजगी मालमत्ता नसून शिवसेनेच्या भगव्या खाली दोन्ही गटांनी जनतेची कामे करावीत व आपल्या ठरवून दिलेल्या वेळी शाखेत बसावे असा तोडगा काढण्यात आला. पोलिसांनी कडक बंदोबस्त लावून परिस्थिवर नियंत्रण मिळविले.
         कुंभारवाडा या शाखेमध्ये शिवसैनिक येऊन बसले असता ही माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना समजतात शिंदे गटाचे सर्वच अधिकारी शाखेजवळ उपस्थित झाले आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली या घोषणाबाजीचे रूपांतर राहण्यामध्ये झाले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या सर्व प्रकारांमध्ये शिवसेनेचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमने-सामने आले शिवसेनेची शाखा कुणाची यावरून वाद रंगला नरेश मस्के यांनी याच्यावरती प्रत्युत्तर देत शाखा ही पुन्हा एकट्याची नाही प्रत्येकाला शाखेत देण्याचा स्वातंत्र्य आहे पण शाखेत काम करण्यासाठी यावं कुणीही दावा सांगण्यासाठी येऊ नये असे देखील वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलं.
thane shivsena eknath shinde

Related posts

राज्य उत्पादन शुल्क विभागात तपास यंत्रणा अधिक सक्षम होणार

dhakkadayak

शुक्रवारी ठाणेकरांना सकाळचा चहा मिळणे कठिन

dhakkadayak

आनंदाचा शिधा वाटप किटमधून रवा,चणाडाळ गायब

dhakkadayak

Leave a Comment