Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

शिंदे – ठाकरे गटात पुन्हा शाब्दिक संघर्ष वाढणार; शिवसेना महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून

ठाणे (प्रतिनिधी ) : शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे रविवार दि. ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी सायं. ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या शिवसेना महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून होत आहे “शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना” या अतुट नात्याला गद्दारीचा शिक्का लागला असून स्वतःच्या राजकीय हवासापोटी शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेची तोफ ठाण्यात येणार आहे .

या जाहीर मेळाव्यासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांचा प्रमुख मार्गदर्शन शिवसैनिकांना मिळणार आहे. तसेच सदर मेळावा हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठीच नाही तर सर्व सामान्य नागरिकांसाठीही असणार आहे. तरी या मेळाव्यासाठी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे शिवसेने ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

shivsena shinde group vs Thackeray group

Related posts

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती वादात

dhakkadayak

अवघ्या ५८ फटाके स्टॉल धारकांनाच परवानगी

dhakkadayak

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी

dhakkadayak

Leave a Comment