Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा काही तासांत शोध

कल्याण : देशात कोणती गोष्ट कधी लोकप्रिय होईल याचा अंदाज लावणे कठिन आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा आपण वापर कसा करतो यावर सर्व अवलंबून आहे. याचाच एक उदाहरण शनिवारी जनतेसमोर आले ते म्हणजे सोशल मीडियावर एक मुलगा हरविले असल्याची माहिती टकल्यानंतर संबधित मेसेज व्हायरल झाला असून संध्याकाळपर्यंत संबधित मुलगा आपल्या पालकांना सापडला असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास अर्जुन (नाव बदलले आहे) आपल्या आईसोब मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. त्यावेळी, आई तेथील डॉक्टरांसोबत बोलत असताना अर्जुन नकळत तेथून निघाला. अर्जुन गतीमंद असून त्याला जास्त बोलता येत नसल्यामुळे मुलगा हरवल्याचे लक्षात येताच आईच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पालकांनी एमआरए पोलीस ठाण्यात मुलगा हरविले असल्याची तक्रार नोंदविन्यात आली. सीएसटी येथून अर्जुनने रेल्वे पकडल्याचे सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्याचबरोबर राहुल सोनावणे आणि प्रशांत अहिरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती व्हायरल केली. त्याचरात्री ११.३० च्या सुमारास हा मुलगा पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळ बसलेला येथील रहिवाशी प्रकाश सावंत यांना दिसला. त्यांनी १०० नंबर वर कॉल केला आणि संबधित माहिती दिली. शनिवारी सकाळी त्या मुलाला आई वडीलांच्या ताब्यात दिल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली. kalyan missing boy got it

Related posts

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती वादात

dhakkadayak

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाश्यांची लूट

dhakkadayak

फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून ठाणेकरांना लाखोचा चूना

dhakkadayak

Leave a Comment