मुंबई (प्रतिनिधी ) : देशात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यात प्रत्येक समाजाचा उमेदवार प्रभावित होत आहे. मात्र नोकरीवर एक नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की अल्पसंख्यांक समाजाला जेवढा नोकऱ्या मिळाल्या हव्या होत्या तेवढा वाटा मिळाला नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ( sharad pawar)
सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांची यादी पाहिली तर मुस्लिमांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांच्या योगदान लक्षणीय आहे. त्यामागे उर्दू भाषेचा योगदान महत्वाचं आहे. आज आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, तर बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही, असं पवारांनी म्हटलं आहे. ‘विदर्भ मुस्लीम इंटलॲक्चुअल फोरम’च्या मंचावर ॲड. फिरदोस मिर्झा (Firdos Mirza) यांनी आज अल्पसंख्यांक समाजातील समस्या अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी पवार बोलत होते. ( ncp )
पुढे पवार म्हणाले, राजकीय पक्षात मुस्लिम समाजाच्या नेत्यांना संधी देण्यात येत नसल्याचे आरोप करण्यात येत आहे मात्र आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुस्लिम आमदार आणि खासदार दोन्ही आहेत त्यामुळे आमच्या पक्षात तरी असा भेदभाव नसल्याचे पवार यावेळी म्हणाले.