मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दूसरा पण सर्वात मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही गोठवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर या दूसरा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला असल्याची माहिती यावेळी मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्क सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.