Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाकरे गटाला ‘मशाल’ तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना’

ठाणे (प्रतिनिधी ) : राज्यात सत्ता संघर्ष सुरु झाल्यानंतर कोणत्या गटाला पक्षाचे चिन्ह मिळेल यासाठी शिंदे आणि ठाकरे गट यांच्या वाद रंगला होता. मात्र निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यामुळे नवीन पेच निर्माण झाला होता, मात्र सोमवारी निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह तर नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव मिळाले आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले असून चिन्हासाठी केलेल्या प्रस्ताव वर निर्णय झाले नाही आणि त्यांना चिन्हासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठीची लढाई ठाकरे आणि शिंदे गटात सुरू होती. निवडणूक आयोगानं यावर मोठा निर्णय घेत शिवसेना पक्षाच्या नावाच्या वापरास बंदीचा आणि धनुष्यबाण निशाणी गोठविण्याचा अंतरिम आदेश जाहीर केला. त्यानंतर दोन्ही गटांना पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी प्रत्येकी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं होतं.

ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हासाठी धगधगती मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे तीन पर्याय देण्यात आले होते. पण त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हे चिन्ह देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह याआधीच डीएमके पक्षाचं आहे. त्यामुळे हेही चिन्ह फेटाळून लावण्यात आलं. तर ठाकरे गटानं सुचवलेला तिसरा पर्याय म्हणजेच मशाल चिन्हाला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटानंही ठाकरे गटावर कुरघोडी करत त्रिशुळ, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय सूचविण्यात आले होते. शिंदे गटाचे हे तिनही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. शिंदे गटाला पुन्हा एकदा निवडणूक चिन्हाचे पर्याय सादर करण्याची संधी दिली आहे.

Related posts

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी

dhakkadayak

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

dhakkadayak

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम

dhakkadayak

Leave a Comment