Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

जिल्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार ! : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे ( प्रतिनिधी) : ठाणे जिल्यात शहरी भागासह, ग्रामीण आणि आदिवासी पाडे आहेत. ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत असून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत विकास पोहचविण्यासाठी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा करून जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा मानस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर शिनगारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जिल्यातील विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली.
       जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक समस्या भेडसावत असून शहारत वाहतूक कोंडी बरोबर पायाभूत सुविधांची वणवा आहे. दरम्यान जिल्हा नियोजन समिती तर्फे विविध कार्यक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य प्रयन्त करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
        ठाणे जिल्हयात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद या सारखे विविध स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यामुळे पोषण आहार,आरोग्य, शिक्षण याचबरोबर रोजगार या प्रमुख विषयावर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
        शहापूर आणि मुरबाड या दुर्गम आणि नैसर्गिक सानिध्यात असलेल्या भागात अधिक काम करण्याची इच्छा असून महसूल विभागातील दावे लवकरात लवकर निकाली काढून सर्वच विभागाला चालना देण्यासाठी प्रयन्त केला जाणार आहे.
      याचबरोबर केंद्र सरकारच्या महत्वाचा योजनांवर भर देण्यात येणार असून अनधिकृत रेती उपसासारखे धंदे बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या खाडीकिनारी असलेल्या कांदळवन सौरक्षणसाठी ठोस भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

Related posts

ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग; मालकाची सुखरुप सुटका

dhakkadayak

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

dhakkadayak

धर्मांतराला विरोध करणाऱ्यांना माराल, तर सहन केले जाणार नाही : नितेश राणे

dhakkadayak

Leave a Comment