Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल – तलवार चिन्ह

ठाणे (प्रतिनिधी ) : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल(सोमवार) निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत मंगळवारी नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते.
दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते.
संबंधित चिन्हांचा अर्थ सांगताना शिंदे गटाकडून सांगण्यात आले की, जनतेचं रक्षण करण्यासाठी ढाल आहे, तर शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी तलवार आहे. ‘सूर्य’ उगवल्याशिवाय आपला दिवस चांगला जाऊ शकत नाही, त्यासाठी ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह सादर केलं आहे. तर ‘पिंपळ’ हे पवित्र झाड आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. आम्हाला जे चिन्ह मिळेल ते घ्यायला आम्ही तयार आहोत.

Related posts

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे अपघातात निधन; तिघे किरकोळ जखमी

dhakkadayak

श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा : नरेश म्हस्के

dhakkadayak

ठाण्यात दिवाळीची सुरुवात गोळीबाराच्या घटनेने सुरु

dhakkadayak

Leave a Comment