Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती वादात

ठाणे (प्रतिनिधी ) : कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर एक आशेचा किरण म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेच्या भरतीकडे पाहण्यात येत होते. मात्र ही भरती प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली.
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या भरती प्रक्रियेत असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबधित भरती प्रक्रिया त्वरित थांबविण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात ही मागणी केली आहे. दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने २६ ऑगस्ट रोजी उमेदवारांकडून नवीन अर्ज मागितले होते.
      सदर पदभरती प्रक्रियेत अनेक युवकानी सहभाग घेतला आहे. २४ सप्टेंबर रोजी परिक्षा प्रक्रिया झाली असून नुकताच निकाल व यादी जाहीर झाली असून या भरती प्रक्रियेत अनधिकृत रित्या आर्थिक व्यवहार झाल्याचे झाल्याचा आरोप झाला आहे.

Related posts

आनंदाचा शिधा वाटप किटमधून रवा,चणाडाळ गायब

dhakkadayak

धर्मांतराला विरोध करणाऱ्यांना माराल, तर सहन केले जाणार नाही : नितेश राणे

dhakkadayak

प्लॅटफॉर्म तिकीट झाले पाचपट महाग

dhakkadayak

Leave a Comment