केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ठाकरे गटावर टिका
मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यात शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार वाद सुरू असून आता या वाद मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. दोन्ही गटांमध्ये पक्ष चिन्ह वरून वाद रंगले असतांना आमचा चिन्ह सर्वात मोठे असे दोन्ही गटांकडून विविध दाखले देत दाखविण्यात येत आहे मक्तर अशी सर्व परिस्थिती असतांना रिपाई अध्यख रामदास आठवले यांनी एक धक्कादायक विधान करून सर्व नाराजी स्वतःकडे ओढण्याचे प्रयत्न केले आहे.
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार, असं रामदास आठवले म्हणाले. आज त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. रामदास आठवले यांनी यावेळी भाजपाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला.