Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला वर्षाला केवळ ५०० रुपये

Thane : गेल्या बारा वर्षात शिक्षकांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे दर महिन्याला सुमारे हजारांची वाढ झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांचे अस्तित्व आहे. त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत एक रुपयांचीही वाढ झाली नाही. प्रचंड अभ्यास करून अतिशय कठीण असलेली शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीचे विद्यार्थी देतात. त्या परिक्षेच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती आजही सरासरी केवळ पाचशे रुपये आहे. त्यामध्ये ग्रामीण भागीतल विद्यार्थ्यांना ती तीनशे पेक्षाही कमी आहे.

रखडलेली शिक्षक भरती, न मिळणारे अनुदान, अतिरिक्त होणारे शिक्षक आणि वेळेवर न होणारे वेतन आदी विषयांवर सातत्याने प्रश्न विचारले जातात. परंतु प्रचंड अभ्यास करुन राज्याच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अनेक वर्षांपासून काहीच वाढ झाली नाही, त्यावर कोणीच काही बोलत नाही अशी खंत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार शिष्यवृत्तीची रक्कम किती? ती किती मुलांना दिली गेली आणि त्यामध्ये कोणत्या साली किती वाढ झाली याची माहिती घेतली तेंव्हा केसरकर यांची मुलांविषयीची खदखद खरी असल्याचे समोर आले.

२०१० सालापर्यंत शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्याना शहर व ग्रामीण भाग असे वर्गीकरण करुन सुमारे दीडशे ते दोनशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. आज २०२२ मध्ये अर्थात बारा वर्षांनीही शिष्यवृत्तीच्या रकमेत एक रुपयांचीही वाढ करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षा आयोजिली जाते. पूर्वी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीसाठी ही परिक्षा आयोजिली जात होती. नंतर त्यामध्ये बदल करून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्याथ्यांसाठी ही परिक्षा आयोजित केली जात आहे. या परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेच पारितोषिक दिले जात नाही मात्र परिषदेकडून पहिल्या १५ ते सोळा हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहिर केली जाते. त्यांना राज्य शसनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

Related posts

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी

dhakkadayak

शिंदे – ठाकरे गटात पुन्हा शाब्दिक संघर्ष वाढणार; शिवसेना महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून

dhakkadayak

सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात फिल्मी स्टाईलने गोळीबार: गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू

dhakkadayak

Leave a Comment