मुंबई : मोबाईल माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी क्रांती असून या मोबाईलमुळे जग जवळ आला आहे. त्याचप्रमाणे यामुळे जगातील एका कोपऱ्यातील माणूस दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाला काही सेकंदातच संपर्क साधु शकतो मात्र या मोबाईलची सवय लहान मुलांना कशाला असा संतापजनक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नवी मुंबई येथील वाशी मध्ये राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीस मोबाईल वापरल्यामुळे आईने समज दिली होती. त्यामुळे, नाराज झालेल्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीने परिचीत व्यक्तीचा मोबाईल वापरल्याचे निदर्शनास आल्यामुळे आई तीच्यावर रागावली होती. मोबाईलचा वापर करू नये अशी समज दिली होती. यामुळे मुलगी नाराज झाली होती.
आईने रागावल्यामुळे मुलगी निराश झाली होती. त्यातूनच, बुधवारी सायंकाळी घरात कोणी नसताना तीने ओढणीने घरातील लोखंडी पाईपला गळफास लावून घेतला

previous post