Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

आजारपेक्षा उपचार भयंकर ; देशातील अनेक पॅरासिटामॉल टॅबलेट चाचणीत फेल 

नागरिकांच्या जीवाशी धोका, कफ सिरप नंतर धक्कादायक माहिती 

ठाणे (प्रतिनिधी ) : देशात विविध साथीच्या रोगातून नागरिक आता बाहेर आले असतांना आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे, ते म्हणजे तापसाठी घेण्यात येणाऱ्या पॅरासिटामॉल टॅबलेट चाचणीमध्ये फेल झाले असल्याचे अहवालातून कळाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वैज्ञानीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परदेशात देशातील कफ सिरप पिउन ६६ बालक दगावले असल्याचे प्रकार ताजे असतांना आता पॅरासिटामॉल टॅबलेट सुरक्षित नसल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे आजार पेक्षा उपचार भयंकर असल्याचे यावेळी स्पष्ट होते.

सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, जवळपास 45 औषधांचे सॅम्पल्स निकृष्ट गुणवत्तेची असल्याचे दिसून आले आहेत. फेल झालेल्या सॅम्पल्सपैकी 13 हिमाचल प्रदेशमधील मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्समधील आहेत. ज्या औषधांचे सॅम्पल्स फेल झाले आहेत, त्यात पॅरासिटामॉलचाही समावेश आहे. खरे तर या औषधांचा उपयोग अत्यंत सामान्य आहे.

‘द ट्रिब्यून’च्या एका वृत्तानुसार, यावर्षी मे महिन्यात सहाय्यक औषध नियंत्रक आणि परवाना प्राधिकरण, नवी दिल्लीने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड विरुद्ध चौकशी सुरू केली होती आणि या कंपनीचे एक औषध Telmisartan (ब्लड प्रेशर मध्ये वापरेले जाणारे) ला ड्रग्स अॅण्ड कॉसमेटिक अॅक्ट 140 च्या कलम 17B (E) नुसार ‘संशयास्पद’ असल्याचे सांगण्यात आले. मोहाली येथील औषध कंपनीचे Ofloxacin आणि Ornidazole अँटिबायोटिकचे नमुनेही चाचणी पास झाले नाहीत.

रिपोर्टनुसार या औषधांचे सॅम्पल टेस्टमध्ये फेल –
– Methycobalamin, Alpha Lipoic acid- USV Pvt Ltd. Baddi
– Paracetamol Tablets – T&G Medicare, Baddi
– Paracetamol Tablets- Alco Formulation, Faridabad
– Paracetamol Tablets- ANG Lifesciences, Solan
– Chlordiazepoxide- Wockhardt, Nalagarh
– Amoxicillin-Potassium Clavulanate- Mediwell Bioteh solan
– Vitamin D3 Chewable tablets- Maxtar Biogenics, Nalagarh
– Ofloxacin and Ornidazole tablets- Amkon Pharmaceuticals, Mohali
– Lvermectin dispersible Tablets- Plena Remedies, Baddi
– Itraconazole Capsules- Theon Pharmaceuticals, Baddi
– Gentamicin Injection- BM Pharmaceuticals, Chandigharh
– Mefenamic acid tablets- Navkar Lifesciences, Baddi
– Aluminium hydroxide- Biogenetic Drugs Pvt Ltd. Baddi

Related posts

ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटचे घोडे अडले कुठे ?

dhakkadayak

आनंदाचा शिधा वाटप किटमधून रवा,चणाडाळ गायब

dhakkadayak

वागळे इस्टेट येथील लुईसवाडी, हाजुरी आणि परिसरातील तरुण नशेच्या विळख्यात

dhakkadayak

Leave a Comment