Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाण्यात ढगांच्या गडगडाट, पावसाची जोरदार बॅटिंग

ठाणे : राज्यासह देशात पावसाचे संपूर्ण वेळापत्रक बदलले असल्याचे चित्र आहे, कारण चार महिने पडणारा पाऊस आता ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे, ठाण्यात शुक्रवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली. शहरामध्ये तासभरात २०.०७ मिमी इतकी पाऊस झाला असून कळवा-खारेगाव परिसरातील दत्तवाडीत पाणी साचले होते. तर दिव्यात झाड पडल्याची घटना समोर आली आहे. हा पाऊस सुरुवातीला होणारा आहे की परतीचा अशी आता रंगू लागली आहे.
शुक्रवारी सकाळपासून आकाश स्वच्छ होते. दुपारी अचानक ४ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाट पावसाला सुरुवात झाली. तासभर बरसलेल्या पावसाने ढगांचा गडगडाटात जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली होती. त्यातच तासभरात तब्बल २०.०७ मिमी पाऊस पडल्याची नोंद शहरात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Related posts

व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरे यांची आत्महत्या

dhakkadayak

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे अपघातात निधन; तिघे किरकोळ जखमी

dhakkadayak

ठाण्यात दिवाळीची सुरुवात गोळीबाराच्या घटनेने सुरु

dhakkadayak

Leave a Comment