Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम

#thane : पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम असते. कायद्याच्या चौकटीत राहून वकिलांनी आरोपीचा बचाव केला पाहिजे. बचाव करणे याचा अर्थ काही करण नसून आरोपीची कायद्याच्या चौकटीत राहून जे काय करणं शक्य आहे ते करणे असा आहे, असे विचार ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले.
विद्याप्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाच्या वतीने फौजदारी दावे या विषयावर एका चर्चासत्राचा आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात बोलताना चव्हाण यांनी हे विचार व्यक्त केले. या चर्चासत्राचा उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रथा आणि न्यायाधीश वरिष्ठ स्तर ईश्वर सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. फौजदारी दाव्यांच्या विविध अंगावर म्हणजेच तपास प्रोसिफिकेशन बचाव आणि न्याय निर्णय यावर एकाच वेळी चर्चा करणे ही फार चांगली कल्पना असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त नागेश लोहार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार पोलिसांनी तपास कसा करायला हवा, कशा प्रकारचे पुरावे गोळा करायला हवेत याविषयी स्वतःच्या अनुभवाचे दाखले देत समजावून सांगितले.
तपास अधिकाऱ्यास कायद्याचे आणि प्रक्रियेचे ज्ञान असल्यास त्यांनी केलेल्या तपासातून त्रुटी शोधून बचाव पक्ष आरोपीला निर्दोष सोडण्याचे प्रयत्न करतात. लोहार यांनी टाडा, पोटा अशा गुन्ह्यांचा तपास केल्याचे सांगितले. 1993 मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटामध्ये नागेश लोहारे तपास अधिकारी होते.
विशेष सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी सरकारी वकिलाची भूमिका स्पष्ट केली. सरकारी वकीलाच प्रथम कर्तव्य हे न्यायालयास न्यायदानासाठी सहकार्य करणे असल्याचं त्यांनी सांगितलं. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायदान करताना अडथळे निर्माण होईल असं कृत्य करू नये. न्याय निर्णय या विषयावर सूर्यवंशी यांनी सांगितलं की न्यायाधीश कधीही पूर्वग्रह ठेवून पुरावे किंवा वादविवाद ऐकत नाही.
तपास अधिकारी सरकारी वकील आणि बचाव पक्ष या सर्वांना त्यांची त्यांची बाजू असते. पण न्यायाधीशाच फक्त कायद्याचीच बाजू असते. त्यामुळे फक्त कायद्याच्या नियमाला धरून चे पुरावे जे तथ्य जी वस्तुस्थिती आहे तो कायदा लागू आणि मान्य आहे, त्याचाच विचार करून निर्णय करणे अपेक्षित असतो. त्यांनी विद्यार्थ्यांनाही न्यायाधीश होण्यासाठी मेहनत करण्याचं आवाहन केलं. प्राचार्य विद्या जयकुमार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. विधी सहाय्य केंद्राचे प्रभारी विनोद वाघ यांनी आभार प्रदर्शन केलं.

Related posts

जिल्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार ! : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

dhakkadayak

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल – तलवार चिन्ह

dhakkadayak

ठाण्यात सुरु असलेली टोइंग व्हॅनची दादागिरी थांबवावी

dhakkadayak

Leave a Comment