Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

अवघ्या ५८ फटाके स्टॉल धारकांनाच परवानगी

ठाणे (प्रतिनिधी ) : कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे राज्यात यंदा दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे, त्यामुळे व्यापारीदेखील या सणाची मोठ्याप्रमाणात तयारी करत आहे. फटाके विक्रेता व्यापार्यांनी यावेळी मोठ्याप्रमाणात तयारी केली असून स्टॉल लावण्यासाठी परवानगी मागितली आहे. आतापर्यंत आलेल्या ७४७ अर्जापैकी केवळ ५८ जणांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांवर दिवाळी आली असतांना महापालिकेच्या कारभारावर प्रश्न विचारले जात आहेत.

यंदा दिवाळी सण देखील मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु ठाणे महापालिकेकडून फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांना अद्यापही परवाने देण्यासाठी उशीर होत असल्याचेच दिसून आले आहे. फटाके स्टॉलला परवाना देण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने केली जात आहे. यात अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला देखील घ्यावा लागत आहे. परंतु त्यासाठी देखील स्टॉल धारकांना कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. हे परवाने मिळविण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे.

Related posts

वागळे इस्टेट येथील लुईसवाडी, हाजुरी आणि परिसरातील तरुण नशेच्या विळख्यात

dhakkadayak

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे – ठाकरे गट आमनेसामने

dhakkadayak

मोबाईल वापरण्यास विरोध केल्यामुळे १२ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

dhakkadayak

Leave a Comment