दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध!
ठाणे : राज्यात दिवाळी सनाची तयारी सुरु असतांना अचानक ठाण्यातील दूध विक्रेता संघ आक्रमक होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी सामान्य ठाणेकराला सकाळचा चहा मिळणार की नाही असा सवाल निर्माण झाला आहे.
गेले चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या दराच्या विरोधात ठाणे शहरातील दूध विक्रेते एक दिवसाचा बंद करणार आहे. या बंदच्या माधमयातून दर वाढीचा निषेध केला जाणार आहे. येत्या शुक्रवारी ठाणे शहरात १०० टक्के दूध पुरवठा बंद करणार असल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संघटनेने सांगितले.
गायीच्या दूधात २ तर म्हशीच्या दूधात चार रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे आणि या दरवाढीचा निषेध म्हणून ठाण्यात १०० टक्के दूध विक्री बंद केली जाईल असे ठाणे शहरातील दूध विक्रेत्यांनी सांगितले.