Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

Paras Porwal Suicide: २३ व्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद करत काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथे गुरुवारी सकाळी आत्महत्येची घटना घडली आहे. पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यानुसार पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते आहे.

Related posts

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष टपाल तिकीट

dhakkadayak

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार : अंबादास दानवे

dhakkadayak

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना अभिवादन

dhakkadayak

Leave a Comment