ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राजकीय वादातून एका शेतकऱ्याच्या ९ जनावरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती यावेळी उघडकीस आली आहे. वैर माणसांशी असावे मात्र जनवरांनी कोणाचे काय बिघडवले होते असा संतापजनक सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये टोकाची इर्षा पहायला मिळाली. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खेडले गावात भास्कर यशवंत खापरे यांच्या शेतावरील गोठ्यात बांधून ठेवलेली 1 गाय 5 म्हैशी व 3 वासरे अशी एकूण नऊ जनावरां अज्ञात व्यक्तिने विष प्रयोग करून किंवा खाण्यातून विष टाकून मारल्याची तक्रार तोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—