Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी वितरित करण्यासंदर्भात आज वन विभागाने निर्देश जारी केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी आज हे निर्देश जारी केले आहेत.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी मनुष्य जीवांचे तसेच शेती बागायतीचे बरेच नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राणाच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढविण्याचा निर्णय वन मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून बाधितांना  ही भरपाई पंधरा दिवसाच्या आत देण्याचाही नियम केला गेला आहे. मात्र दिवाळीनिमित्त घराघरात अनेक प्रकारचे खर्च आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन ही भरपाई बाधित व्यक्तींना  दिवाळीच्या आधी मिळावी अशी सूचना वनमंत्र्यांनी केली होती. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया गतिमान करत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची नुकसानभरपाई दिवाळी आधी वितरित करण्याचे आदेश आज वन विभागाच्या सचिवांनी एका परिपत्रकान्वये जारी केले आहेत.

Related posts

सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात फिल्मी स्टाईलने गोळीबार: गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू

dhakkadayak

व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरे यांची आत्महत्या

dhakkadayak

खासदार राजन विचारे यांच्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात

dhakkadayak

Leave a Comment