Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण

ठाणे (प्रतिनिधी ) : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात नाफेरीवाला क्षेत्र असतांना देखील याठिकाणी मोठ्याप्रमाणात फेरिवाल्यांनी आपली दुकाने लावली असल्यामुळे नौपाडा आणि गोखले रोड परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागाने या परिसराची पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजप व्यापारी सेल ठाणे जिल्हा अध्यक्ष मितेश कानजी शहा यांनी केली आहे. गुरुवारी या संदर्भातील एक निवेदन वाहतूक विभागाला शहा यांनी दिले आहे.
मितेश शहा यावेळी म्हणाले की, ठाणे स्टेशन परिसरात सकाळी व संध्याकाळी बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नाफेरीवाला क्षेत्र असून सुद्धा अनधिकृतपणे फेरीवाले तिथे ठाण मांडून बसलेले असतात. त्याचप्रमाणे स्टेशन ते गावदेवी रोड या परिसरात अनधिकृत रिक्षा सुद्धा उभ्या असतात. त्यामुळे नागरिकांना व पादचाऱ्यांना नाहक त्रास होतो.
    ठाणे स्टेशनं वरून नागरिकांना गोखले रोड येथे जायचे असल्यास त्यांना शिवाजी पथ मार्गे राम मारुती रोड याप्रकारे जावे लागत असल्यामुळे वाहनचालकांना सुद्धा नाहक त्रास होतो. होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे तेथील स्थानिक रहिवासी आपली वाहने आपल्या बिल्डिंगमध्येसुद्धा नेऊ शकत नाही. त्यामुळे या परिसराचा पाहणीदौरा करून स्टेशनं पासून डावीकडे आलोक हॉटेल चौक गावदेवी मंदिर गोखले रोड अशी वाहतूक सुरु करून या वाहतूककोंडीतून तेथील स्थानिक नागरिकांना, पादाचाऱ्यांना, व तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यापारीवर्गाला न्याय द्यावा अशी मागणी शहा यांनी यावेळी केली आहे.

Related posts

ठाण्यात पंचतारांकित हॉटेलची चर्चा रस्ते मात्र सिंगल स्टार

dhakkadayak

ठाण्यात सुरु असलेली टोइंग व्हॅनची दादागिरी थांबवावी

dhakkadayak

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे – ठाकरे गट आमनेसामने

dhakkadayak

Leave a Comment