Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरे यांची आत्महत्या

ठाणे : मुंबईतील व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप मोरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व मुले असा परिवार आहे. मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. न्यूज १८ नेटवर्क मध्ये संदीप मोरे काम करत होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. संदीप मोरे हे जोगेश्वरी पूर्वेकडील शंकरवाडी इथं वास्तव्यास होते. संदीप मोरे यांची पत्नी रोशनी, मुले व आई त्यांचा मेव्हणा सतीश चव्हाण याच्या नवीन घराच्या वास्तू पूजेसाठी गेले होते. संदीप हे घरी एकटेच होते. रोशनी मोरे यांना त्यांच्या जाऊबाई अर्चना यांनी फोन करून संदीप जिवाचे बरेवाईट करून घेत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच रोशनी मोरे व इतर नातेवाईक ताबडतोब मुंबईतील घरी परतले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संदीप मोरे हे हॉलमध्ये हॉलमधील फॅनला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.

Senior video journalist dies by suicide

Related posts

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावी लागणार पायपीट

dhakkadayak

ठामपा क्षेत्रात धूळ प्रदूषण करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

dhakkadayak

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

dhakkadayak

Leave a Comment