Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना अभिवादन

  मुंबई :– कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवगृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमयेपोलीस महासंचालक रजनीश सेठमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

            कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी 21 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येते. मागीलवर्षी देशभरात विविध पोलीस दलांतील 62 अधिकारी व 202 कर्मचारी शहीद झाले आहेत. या पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने वीरमरण आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतिंना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले. यावेळी मुख्यमंत्री  शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित विविध देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस शहिदांच्या कुटुंबियांची  भेट घेतली.

Related posts

कागदावरची शैक्षणिक प्रगती

dhakkadayak

बेपत्ता महिला घरी कधी परतणार, शेकडो कुटुंबांची प्रतीक्षा

dhakkadayak

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार : अंबादास दानवे

dhakkadayak

Leave a Comment