ठाणे (प्रतिनिधी ) : देशभरात शुक्रवारपासून दिवाळीची सुरुवात झाली मात्र ठाण्यात दिवाळीची पहिली सकाळ गोळीबाराच्या घटनेने झाली आहे. ठाण्यात दोन तासांमध्ये 2 गोळीबाराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. येऊरमध्ये वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीवर गोळीबार झाला तर नौपाडा परिसरात सकाळी गोळीबार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गँगवार मधून येऊर परिसरात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली आहे. ज्याच्यावर गोळीबार झाली ती व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे. नुकतच हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला होता. या घटनेमुळे ठाण्यात गॅंगवारला ऊत आला आहे. गेल्या महिन्याभरात ३ गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.