बाहेर रिक्षाचे भाडे तर रेल्वे स्थानकत प्लॅटफॉर्म तिकीट वाढले
ठाणे (प्रतिनिधी ) : दिवाळी सनानिमित्त नागरिक मोठ्याप्रमाणात गावी जातात तर काही लोक गावातून मुंबईत येतात त्यामुळे या गर्दीचा फायदा घेत भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट झाले पाचपट महाग केले आहे. त्यामुळे नागरिकांना जबरदस्त धक्का बसला असून नातेवाईकांना घेण्यासाठी मोठी नोट प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी तयार ठेवावी लागणार आहे.
महागाई मोठ्याप्रमाणात वाढली असून एकही वस्तू उरला नाही की ज्याची किंमत घसरली असेल. अशी सर्व परिस्थिती असतांना शुक्रवारी भारतीय रेल्वेकडून नातेवाईकांना घेण्यासाठी रेल्वे स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना धक्का दिला आहे. २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे असेही मध्य रेल्वेने ट्वीट करत स्पष्ट केले आहे.
या स्थानकावरील तिकीट महागले
सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar), ठाणे (Thane), कल्याण ( Kalyan) , लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल (Panvel) रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे.