Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण वाढले

मुंबई (प्रतिनिधी ) : मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याचे लग्न १८ वर्षानंतर करण्यात यावे यासाठी देशातील अनेक महापुरुषांनी संघर्ष केले, वेळप्रसंगी लोकांच्या टिका सहन केल्या मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात बालविवाह वाढले असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.
नॅशनल क्राईण रेकॉर्ड ब्यूरो(NCRB)च्या आकडेवारीनुसार 2012 ते 2021 या 10 वर्षांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत 4.5 हजारांहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यापूर्वीपासून भारतात बालविवाहविरोधी कायदा करण्यात आला आहे. 1929 पासून हा कायदा देशात अस्तित्वात आहे. 1929 मध्ये मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे तर मुलींचे वय 14 वर्षे होते. त्यानंतर या कायद्यात बदल करण्यात येऊन 1978 मध्ये मुलांचे लग्नाचे वय 21 तर मुलींसाठी संमती वय 18 वर्षे करण्यात आले आहे.पण तरीही या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १,१५० बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले आहे. १ जानेवारी २०१९ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये अवैधरित्या होणारे हे बालविवाह यंत्रणेने रोखले आहेत,अशी माहिती महिला व बालविकास विभागा कडून समोर आली आहे. गेल्या वर्षी ५८० बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले होते. याकडे सामाजिक कार्यकर्ते पंढरी पाटील यांनी लक्ष वेधले.

Related posts

…तर शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल : अजित पवार

dhakkadayak

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

dhakkadayak

धक्कादायक न्यूजच्या बातमीचा इम्पैक्ट ; जुगार – मटका अड्ड्यावर कारवाई

dhakkadayak

Leave a Comment