Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

आनंदाचा शिधा वाटप किटमधून रवा,चणाडाळ गायब

  • ठाणे (प्रतिनिधी ) : शिंदे फडणवीस सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा जाहीर केला. शंभर रुपयांत एक किलो पामतेल, एक किलो, साखर, रवा, आणि चणाडाळ असे साहित्य देण्याची योजना हाती घेतली आहे. यात काही गैरप्रकार झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिलेली असताना मुरबाड तालुक्यात सुमारे २०१८ किलो रवा आणि १३२२३ किलो चणाडाळ कमी आल्याने तालुक्यातील अनेक लाभार्थी हे दिवाळीचे फराळापासून वंचित राहणार असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
    मुरबाड तालुक्यात १९६ रास्त भाव दुकानात आनंदाचे शिधा किटचे ३२ हजार ७४३ पात्र लाभार्थी आहेत. मात्र मुरबाड तालुक्यात सुमारे २०१८ किलो रवा आणि १३ हजार २२३ किलो चणाडाळ कमी आल्याने कोणत्या दुकानात या वस्तू कमी द्यायच्या व कोणाला परिपूर्ण द्यायच्या शिवाय ज्या लाभार्थी ना या वस्तू कमी येतील त्यांचेकडून किती पैसे घ्यायचे त्यांनी तक्रार केली तर कारवाई कोणावर केली जाईल विवंचनेत दुकानदार सापडले आहेत.
    दरम्यान गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत शंभर रुपयांत आनंदाचे शिधा किट वाटप करण्याची घोषणा करीत असले तरी त्यामध्ये दिवाळीच्या फराळात असलेली करंजी आणि चिवडा लाडू तयार करण्यासाठी रवा आणि चणाडाळ गायब असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे

Related posts

अवघ्या ५८ फटाके स्टॉल धारकांनाच परवानगी

dhakkadayak

ठामपा क्षेत्रात धूळ प्रदूषण करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

dhakkadayak

ठाण्यात सुरु असलेली टोइंग व्हॅनची दादागिरी थांबवावी

dhakkadayak

Leave a Comment