हडपसर (जिल्हा पुणे) – येथील एका १३ वर्षीय शालेय मुलावर पाद्री (ख्रिस्ती धर्मगुरु) विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. याआधीही या पाट्र्यावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेले आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईवडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र तेथेही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो आणि मारुति भापकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण पुन्हा हडपसर पोलिसांकडे नेले. तेथे न्याय मिळत नाही म्हणून ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही भेटले. तरीही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. शेवटी या सामाजिक कार्यकर्त्यांनी देहली येथील ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगा’कडे (‘एन्. एच्.आर्. सी. ‘कडे) तक्रार केली. त्यानंतर जवळ जवळ १० मासांनंतर आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली आणि त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला अन् तेथून हे प्रकरण कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
पीडित मुलाच्या आईवडिलांनी सांगितले की, हडपसर पोलिसांच्या टोलवाटोलवी नंतर त्यांनी ४ पोलीस ठाणी आणि १ पोलीस चौकी येथे तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विन्सेंट परेरा यांना बोलावून घेतले आणि तोंडी क्षमा मागायला लावली अन् प्रकरण मिटल्याचे सांगितले.

previous post