Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

मुंबई- फटाक्यांमुळे राज्यात ३० हून अधिक आगीच्या घटना घडल्या. यांमध्ये अनेक जण घायाळ झाले. पुणे येथे फटाक्यांमुळे १७ मुले घायाळ झाली. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे राज्यात काही दुकाने, गोदामे यांना आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. २४ ऑक्टोबर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे राज्यात विविध ठिकाणी १७ हून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत.

  • यवतमाळ येथील राळेगाव शहरात असलेल्या क्रांती चौकातील ३ दुकानांना आग लागली. ठाणे जिल्ह्यात फटाक्यांमुळे ५ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. येथील उल्हासनगरमध्ये गोल मैदानाच्या परिसरातील हिरापन्ना इमारतीवर एका अज्ञात व्यक्तीने २४ ऑक्टोबरच्या उत्तररात्री रॉकेट सोडले. रॉकेट सोडतांनाचे चित्रीकरण करून या व्यक्तीने हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्याचा विकृतपणाही केला. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. fire due to crackers

Related posts

उद्धव सेनेला सोडून माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

dhakkadayak

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे – ठाकरे गट आमनेसामने

dhakkadayak

ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग; मालकाची सुखरुप सुटका

dhakkadayak

Leave a Comment