मुंबई : मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार अनेकांकडून येत होती त्यामुळे नागपूर खंड पिठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या निर्णयामुळे मोकाट सुटलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताना आढळल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास, कुत्र्यांना खाऊ घालणा-यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक नागपूर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. कुत्र्यांना खाऊ घालणा-या व्यक्तींवर 200 रुपये दंड आकारण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.