Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटचे घोडे अडले कुठे ?

ठाणे : कळव्यात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर आता शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. ठाणे शहरासाठी असलेली क्लस्टर योजना आजही मार्गी लागतांना दिसून आलेली नाही. ४५ युआरपी तयार झाल्यानंतर किसननगर भागात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टरचे भुमीपुजन करण्यात आल्यानंतर आजही क्लस्टरची एकही बिट लागू शकलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पुढे येणाऱ्या विकासकांना क्लस्टर सेलकडून ना हरकत परवाना दिला जात नसल्याने या इमारतींचा पुनर्विकासही रखडला आहे. त्यामुळे पालिकेला यावर तत्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा यापेक्षा वाईट घटना ठाण्यात घडू शकतात, अशी भिती व्यक्त केली जात आहे. thane cluster development

लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, दिवा, नौपाडाया परिसरात मोठ्याप्रमाणात धोकादायक इमारती आहेत. मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वीच वागळे विभागात क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात करणार असल्याची घोषणा देखील केली होती. परंतु, या दिवाळीत या क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात होईल, अशी नागरिकांना आस वाटत असताना यावेळची दिवाळी देखील नागरिकांची धोकादायक घरांमध्ये गेलेली आहे. शिंदे यांनी या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. परंतु, आता तेच मुख्यमंत्री असल्याने या योजनेचे काम योग्य पध्दतीने होऊ शकते. त्यामुळे त्यांनी ही योजना मार्गी लावावी अशी मागणी ठाणोकर करीत आहेत. त्यातही या महत्वकांक्षी प्रकल्पाचे दोनदा उद्घाटन करण्यात आले आहे.

यासाठी पालिकेने क्लस्टरला आवश्यक असणारी प्रक्रि या देखील पूर्ण केलेली आहे मात्र प्रत्यक्षात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कामाला सुरु वात कधी होईल याकडे ठाणेकरांची लक्ष लागले आहे. त्यातही क्लस्टर योजना सुरु व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपोषणसुध्दा केले होते. दरम्यान क्लस्टर योजनेचा नारळ वाढविल्यानंतर त्यालाही दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात होऊ शकलेली नाही. त्यात धोकादायक सेक्सटॉ‍ झालेल्या इमारतींचा पुनःर्विकास करण्यासाठी पुढे येणाऱ्या विकासकांना आता अंतर्गत मेट्रो आणि क्लस्टरचा अडसर पुढे येत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारती पाडून त्याठिकाणी पुर्नः विकासाच्या इमारती उभारण्यासाठी पाठपुरावा सुरु असतांना तुमचा परिसर क्लस्टर मध्ये येत आहे, तुमच्या इमारतीखालील मेट्रोची लाईन जाणार असल्याची कारणे पालिकेकडून दिली दिला. या प्रकारा जात आहेत. त्याचा परिणाम म्हणूनही धोकदायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचे दिसून आले आहे.

Related posts

वागळे इस्टेट येथील लुईसवाडी, हाजुरी आणि परिसरातील तरुण नशेच्या विळख्यात

dhakkadayak

ऐनदिवाळीत ठाण्यात पाणी संकट

dhakkadayak

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ठाण्यात वातावरण निर्मिती

dhakkadayak

Leave a Comment