Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

धक्कादायक विश्लेषण : गुजरातमध्ये  तिरंगी  सामना 

काल गुरुवारी गुजरात राज्याची विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तिन्ही बड्या पक्षाचे नेते कामाला लागले आहे. आतापर्यंत गुजरातच्या सिंहासनाची लढाई भाजप आणि कॉंग्रेस या दोनच पक्षात होत होती; मात्र आता काळ बदलला असून या दोन्ही पक्षात तीसरा पक्ष मोठ्या हिंमतीने पुढे येत आहे तो म्हणजे आम आदमी पक्ष, फरक एवढाच की, या निवडणुकीत भाजपचा सामना कॉंग्रेसऐवजी आम आदमी पक्षाशीदेखील असणार आहे!  या निवडणुकीकडे संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमध्ये निवडणुकीचे मोसमी वारे वाहू लागले आहेत.
       गुजरातमध्ये आतापर्यंत निवडणुकीच्या मैदानात भाजप आणि कॉंग्रेस हे दोनच पक्ष असायचे. परंतु, यावेळेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ताल ठोकली आहे. यामुळे यंदाची लढत तिरंगी होणे आहे. भाजप आणि कॉंग्रेस ही दोन्ही पक्ष सध्या उमेदवारांच्या नावावर काथ्याकुट करीत असतानाच केजरीवाल यांनी 73 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 30 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. सर्वात आश्‍चर्याची बाब अशी की, केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याचा केवळ दावा केलेला नाही तर; गुजरातच्या भावी मुख्यमंत्र्याचे नाव ठरविण्यासाठी लोकांकडून सूचना मागविल्या आहेत. एवढेच नव्हे तर, भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच डावपेचात अडकविण्याचा प्रयत्न आपकडून केला जात आहे.
     भाजप हिंदू मतांना एकजूट करण्याचे प्रयत्न करीत आहे. तर, केजरीवालही हिंदू मते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहे. यासाठी त्यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्यात यावे, अशी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी खेळलेल्या या डावाचा किती फायदा त्यांना निवडणुकीत होतो? हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.
देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार आहे ते दहा वर्षांपासून. दिल्लीनंतर पंजाबमध्ये “आप’ला एकहाती सत्ता मिळाली. आता “आप’ने आपला मोर्चा गुजरातकडे वळविला आहे. सुरुवातीला “आप’ने हिमाचल प्रदेशातही पूर्ण जोर लावला होता. परंतु, आता “आप’ने आपले पूर्ण लक्ष गुजरातवर केंद्रित केले आहे. मागील चार महिन्यांच्या काळात “आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 15 पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून “आप’ने गुजरातमधील सर्व गटाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. एकटे केजरीवाल यांच्या चार-चार सभा झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचार करायला सुरुवात केली आहे. एकामागून एक सभा होत आहेत. केंद्र सरकार पॅकेजची घोषणा करीत आहे तर केजरीवाल मोफत पेटंटचा पुनरूच्चार करीत आहेत. परंतु, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी गुजरातच्या प्रचाराकडे ढुंकूनही बघितलेलं नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसची धुरा आपल्या हाती घेतली आहे. परंतु, त्यांच्याही बोलण्यातून गुजरातचा विशेष असा उल्लेख ऐकायला आला नाही. 2017 मधील विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी अख्खा गुजरात पिंजून काढला होता. चांगले यशही मिळाल होते. कॉंग्रेस येथे सध्या मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.

Related posts

धक्कादायक : निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह चिन्ह गोठवले

dhakkadayak

बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे मुंबई कनेक्शन ; एका विद्यार्थ्यांकडून दहा ते बारा हजार घेतल्याचे संशय

dhakkadayak

कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ

dhakkadayak

Leave a Comment