Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
मुंबई

शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार

राज्य सरकराने जाहीर केल्या नवीन सुधारणा ;  उमेदवारांना समान संधी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळणार 
मुंबई (प्रतिनिधी ) : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असून ही शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारेच करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आले आहे. टीईटी प्रकरण उघडकीस आल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते मात्र सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी आणि गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे म्हणून पवित्र प्रणाली द्वारेच ही शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
       राज्यातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक पदभरतीमध्ये काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये भरती प्रक्रिया राबवताना कार्यपद्धतीमध्ये बदल व सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारणा नेमक्या काय आहेत
याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्द होती. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकराने एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Related posts

आरटीई प्रवेश रखडणार ; खासगी शाळांकडून दादागिरी सुरु

dhakkadayak

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती

dhakkadayak

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच,निर्विवाद आघाडी

dhakkadayak

Leave a Comment