Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Uncategorizedठाणे

ठाण्यात पंचतारांकित हॉटेलची चर्चा रस्ते मात्र सिंगल स्टार

ठाणे (प्रतिनिधी ) : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील घोडबंदर रोड येथे एका पंचतारांकित हॉटेलचे (five star hotel ) उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात असे अनेक हॉटेल सुरु व्हावेत अशी आशा व्यक्त केली मात्र याच हॉटेलच्या कार्यक्रमसाठी जाताना जे रस्ते होते त्याची मात्र खुप परिस्थिती वाईट असल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर हॉटेलप्रमाणे रस्तेदेखील पंचतारांकित असावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
For more information Watch this video
वाघबीळ येथील रस्त्याचे व्हिडिओ धक्कादायक न्यूजच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करत सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र संबधित विभाग याकडे लक्ष देणार की नाही असा संतापजनक सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

Related posts

राज्यात होणार एलएनजीपासून वीजनिर्मिती

dhakkadayak

सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा काही तासांत शोध

dhakkadayak

फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून ठाणेकरांना लाखोचा चूना

dhakkadayak

Leave a Comment