ठाणे : गेले वर्षेभर टोइंग व्हॅन बंद होती. अचानक ती चालू करण्यात आली. त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड संताप आहे. कोणतीही पूर्व सुचना न देता रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकी उचलण्याचे प्रमाण या टोइंग कंत्राटदारकडून वाढले आहे त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता संगम डोंगरे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्रद्वारे केली आहे.
टोइंग व्हॅन ने एखादी टू व्हीलर उचलली तर ७००/- हा दंड अधिक ३६ रु. जी. एस. टी. असे एकूण ७३६/- दंड आकारण्यात येत आहे. हा दंड सर्वसामान्य नागरीकांना न परवडणारा आहे. आज दूधाचा भाव ७० रु. लिटर झाला आहे सर्व सामान्याच्या घरी १० दिवस इतके दूध त्यांच्या मुलाबाळांना घरी नेता येईल. टोइंग व्हन ज्या गाडया उचलतात त्या धरपकड करुन उचलतात त्यामुळे गाड्याचे होणारे नुकसान होते ते टोइंग व्हॅन ठेकेदार यांनी भरुन दिले पाहिजे. तसेच मेडीकल, हॉस्पिटल, शाळा अशा ठिकाणी टोइंग व्हॅन यांनी सामाजीकता पाळून टोइंग करु नये असे सर्वसामान्य जनतेस वाटते.
त्याचप्रमाणे जेव्हा टोइंग व्हॅन येते तेव्हा त्यामधील असणारे ट्रफिक कर्मचारी कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता टोइंग व्हॅन वरील मुले रस्त्यावर अगोदर धावतच रस्त्यावरील गाडया टोइंग करतात त्याकरिता सर्वसामान्य जनतेचे असे मत आहे की, ज्यावेळेस टोइंग व्हॅन येते तेव्हा त्यांनी अगोदर गाडया न उचलण्याची घोषणा यांची रेकॉडिंग त्यांनी स्वतःकडे करून ठेवावे जेणेकरून ज्यावेळेस टोइंग न रस्त्यावरील गाडया उचलतील त्यावेळेस ज्यांची गाडी उचलली गेली आहे त्यांना ती अगोदर केलेल्या घोषणाची रेकॉडिंग ऐकून दाखवावी व अशावेळेस जो दंड आहे तो जनतेस भरण्यास बंधनकारक राहील.
त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करावी. तसेच रस्त्यावर पी -१ व पी-२ अशी पार्किंग उपलब्ध करून दिली पाहिजे व रस्त्यावर पिवळे पट्टे मारल्यास जनतेला गाडी त्याच पिवळ्या पट्टयामध्ये पार्किग करता येईल. तसेच महापालिकेनी सदरची पार्किंग ही मोफत किंवा सर्वसामान्य लोकांना परवडणा-या दरामध्ये करुन दिली पाहिजे. तसेच पार्किंगची सोय प्रथम करा नंतरच टोइंग व्हॅन चालू करा अन्यथा अंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि सर्व उदभवणा-या समस्येस आपणच जबाबदार रहाल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे.