ठाणे : ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन टोळीमध्ये गोळीबार सुरू असल्याची घटना सुरू होती मात्र काही काळ हे सत्र थांबले होते पण बुधवारी ठाण्यातील कशेळी भागात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गण्या कोकाटे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर अज्ञात इस्माकाकडून गोळीबार करण्यात आला आहे. कोकाटे आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना ही फायरिंग करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा गॅंगवार पुन्हा डोके वर काढतोय की काय अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात येत आहे, गण्या कोकाटे याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल

previous post